डांगसौंदाणे – बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांमार्फत शेतकऱ्यांना केला जाणारा शेती कर्ज पुरवठा हा काही अंशी धीम्या गतीने होत असल्याच्या शेतकरी वर्गाच्या तक्रारींमुळे आमदार दिलीप बोरसे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र सोनजे यांचे सहकार्याने तालुक्यात डांगसौंदाणे व मुल्हेर येथे शेतकरी ग्राहक मेळावे घेऊन शेतक-यांना कमी कालावधीत शेती कर्ज मंजूर करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज डांगसौंदाणे येथील श्रीराम मंदिर सभागृहात आ.दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव विभागाच्या वतीने किसान संपर्क अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात परिसरातील असंख्य शेतक-यांनी सहभाग घेत बँकेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र सोनजे यांचा समोर विविध समस्या मांडल्या. या मेळाव्यात विभागीय कार्यालयातील प्रबंधक तपन गुप्ता डांगसौंदाणे शाखेचे व्यवस्थापक हिमांशू भंगोत्रा उपव्यवस्थापक पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. बोरसे व उपस्थित अधिकारी वर्गाचा डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी कार्यक्रमास उपस्थित शेतकरी वर्गाने शेती पिक कर्ज वाटप हे बँकेच्या माध्यमातून किचकट कागदपत्रांच्या माध्यमातून होत असल्याने अनेक वेळा शेतकरी कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करूनही कर्ज मिळत नसल्याचा समस्या मांडल्या तर सर्च रीपोर्टची मुदत ही ३० वर्ष असल्यावरही बँक व्यवस्थापन दर ५ वर्षांनी नवीन मागत असल्याने शेतक-यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या बँक ऑफ महाराष्ट्र डांगसौंदाणे शाखा ही ३८ खेड्यांची केंद्र बिंदू असलेली एकमेव शाखा असल्याने या शाखेचे विस्तारीकरण करून तळवाड़ेदिगर व साल्हेर येथे शाखा उघडण्याची मागणी करण्यात येऊन डांगसौंदाणे शाखेचेअधिकारी कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली. बँकेचे ATM हे कायम स्वरूपी बंद असते तर बँक मित्रांची संख्या कमी असल्याने त्यांची संख्या वाढविण्यात यावी शेती वर गृह कर्ज देण्यात यावे अशा विविध मागण्या आ.दिलीप बोरसे यांच्या समोर शेतक-यांनी केल्या शेतकऱ्यांच्या समस्यांना उत्तर देताना विभागीय व्यवस्थापक रवींद्र सोनजे यांनी डांगसौंदाणे शाखा ८५ कोटी रुपये उलाढाल असलेली शाखा आहे. या भागातील शेतकरी जो बँकेचा ग्राहक आहे तो प्रमाणिक असल्याने बँकेची येथील स्थिती समाधान कारक असल्याचे सांगत कुठेलीहे कर्ज प्रकरण ७ दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नसल्याची ग्वाही उपस्थित शेतकरीवर्गाला दिली या मेळाव्यात काही शेतक-यांना कर्ज मंजुरी आदेशाचे वाटप आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी आमदार बोरसे यांनी शेतक-यांशी हितगुज साधताना सांगितले की बँक ही शेतक-यांचा आत्मा असून बँक आणि शेतकरी यांच्यात समनव्यय असला तर शेतक-याला तात्काळ कर्ज मिळते शेतक-याला उभारी देण्यासाठी बँकांनी शेतक-यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहत वित्त पुरवठा करावा व शेतकरी हित साधावे असे आवहान बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांना करीत मेळावा आयोजित करणाऱ्या मोहिनीराज ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्राचे आभार मानत शेतक-यांनी बँकेशी संपर्क करीत कर्ज प्रकरणे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सटाणा कृऊबा समितीचे संचालक पंकज ठाकरे ,हेमंत चंद्रात्रे, डांगसौंदाणे उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे ,विजय सोनवणे, नंदू बैरागी, बेनिराम चिंचोरे, पंढरीनाथ सोनवणे ,अनंत दीक्षित ,कैलास केल्हे ,राजेंद्र परदेशी ,गोविंद चिंचोरे ,सुवर्णा सोनवणे, कैलास बोरसे, दिगंबर भदाणे, महेश सोनवणे, सोमनाथ सूर्यवंशी, तुकाराम देशमुख, साहेबराव काकुळते, पत्रकार निलेश गौतम, सुमेध चंद्रात्रे, किशोर चिंचोरे, किशोर बोरसे ,चेतन चव्हाण, राजेंद्र येवला यांचेसह असंख्य शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे यांनी केले