डांगसौंदाणे- येथे वैष्णव समाजाचे आद्य गुरू जगदगुरु स्वामी रामानंदाचार्य महाराज यांच्या ७२३ व्या जन्मोत्सवानिमित्त नाशिक जिल्हा वैष्णव बैरागी विकास फाऊंडेशनच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
निवृत्त मुख्याध्यापक लालदास अत्रे अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला प्रभू श्रीराम व रामानंदाचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास वैष्णव बैरागी विकास फाऊंडेशनचे जिल्हाअध्यक्ष दिलीप बैरागी, संचालक बापू बैरागी, तालुकध्यक्ष विठ्ठल बैरागी, दिगंबर बैरागी, प्रविण बैरागी, अशोक बैरागी, श्याम बैरागी, रावसाहेब बैरागी, अण्णा बैरागी, बुंधाटे येथील सरपंच नंदूदास बैरागी, कैलास बैरागी, मंगलदास बैरागी, ताराचंद अत्रे, प्रमोद बैरागी, सुभाष बैरागी, शाम बैरागी, रेखावती बैरागी, अश्विनी बैरागी, वत्सला बैरागी, चित्रा बैरागी, रंजना बैरागी, बालिका बैरागी, मीना बैरागी, विमल बैरागी हे कार्यक्रमास उपस्थित होते. स्वामी रामानंदाचार्य यांच्या जीवनाविषयी रेखावती बैरागी, लालदास अत्रे, पत्रकार प्रशांत बैरागी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विठ्ठलदास बैरागी यांनी सूत्रसंचालन केले.