सटाणा – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जवसुली करिता धडक मोहीम चालू केली आहे. या मोहिमेत सटाणा तालुक्यातील जप्त केलेल्या ७ ट्रक्टरचा लिलाव करण्यात आला. या ७ टॅक्टरची तालुका निबंधक यांच्याकडून मूल्यांकन करून बुधवारी हा लिलाव सटाणा येथेच करण्यात झाला. या लिलावातून बँकेला १६ लाख ५ हजार रुपये प्राप्त झाले. लिलाव करण्यात आलेल्या ट्रँक्टरचे मालक २००९ ते २०११ या कालावधीतील थकबाकीदार आहेत. या थकबाकीदाराना बँकेने कर्ज मागणी नोटीसा देऊनही व वारंवार सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नसल्याने हे ट्रॅक्टर जप्त करुन त्याचा लिलाव करण्यत आल्याचे बँकेने सांगितले.
जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यास सक्त आदेश दिले आहे.
जिल्हयातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारची जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली आहे. या योजनेस दिनांक २८ फेब्रुवारी पावेतो मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने केले आहे.