मुंबई – भारतरत्न आणि महान क्रिकेटपटू मास्चर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विटरवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. मी योग्य ती खबरदारी घेत आहे. अत्यंत सौम्य स्वरुपाचे लक्षणे दिसत असल्याने मी चाचणी केली. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी घरातील अन्य जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे व माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचे आभार, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021