नाशिक – सकल मराठा समाजातर्फे १७ आॅगस्टला जागर गोंधळ आंदोलन नाशिक येथे सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळया समोर करण्यात येणार आहे. गुरुवारी सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक औरंगाबाद रोड येथील वरद लक्ष्मी लॉन्स येथे झाली. या बैठकीस मराठा क्रांती मोर्चा राज्य समनव्यक करण गायकर, गणेश कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आरक्षण लढा व मराठा समाज मागण्यांबाबत भूमिका व्यक्त केली.
या बैठकीत जमलेल्या समाज बांधवांनी मत व्यक्त केले, शरद तुंगार, शरद शिंदे, योगेश कापसे,निलेश मोरे,निलेश गायखे माधवी पाटील यांनी भूमिका मांडली यावेळी विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. या बैठकीत करण गायकर, गणेश कदम, राजू देसले, संदीप शितोळे निलेश मोरे, योगेश कापसे, शरद तुंगार, विजय खरजुल, ज्ञानेश्वर थोरात, सचिन पवार, धानेश्वर भोसले, प्रमोद जाधव , निलेश गायखे, प्रवीण घोडे, सोमनाथ जाधव, शिवाजी मोरे, विजय खर्जुल, ज्ञानेश्वर थोरात, अनिल गोवर्धने, महेश आहेर एमडी शिंदे, सागर पवार, वैभव दळवी, समीर शिंदे, विनायक शिंदे, पूजा धुमाळ, माधुरी पाटील, संदीप जाधव, उत्तम कापसे, मंगेश जाधव, उत्तम कापसे, भाग्यश बागमर आदी उपस्थित होते.