नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी आलेले रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच ते दिल्लीत आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन विवाहीत मुली असा परिवार आहे. रेल्वेच्या कारभाराला दिशा देण्यासाठी त्यांनी ठोस प्रयत्न केले. बेळगाव मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करीत होते.