नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००१ च्या संसद हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “२००१ मध्ये या दिवशी आमच्या संसदेवर झालेला भ्याड हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही. आपल्या संसदेचे रक्षण करताना आपले प्राण गमावलेल्यांचा पराक्रम आणि त्याग आमच्या स्मरणात आहे. भारत नेहमीच त्यांच्याप्रति ऋणी राहील.“ तसेच, दिल्लीसह देशाच्या अन्य भागातही विविध संस्था संघटनांकडून या घटनेतील शहिदांना श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.