माता रमाईचा त्याग खूप मोठा असून भल्या पहाटे गौ-या थापून,त्या बाजारात विकून घर खर्च करुन बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी पैशाची मदत केली होती.अशी माता पुन्हा होऊ शकत नाही.असे सांगून डॉ.बाबासाहेबांनी सर्वसामान्यांना मताचा अधिकार प्राप्त करुन दिलेला आहे.परंतु, हाच अधिकार पाचशे रुपयांवर लोक विकत आहे.त्यामुळेच नालायक लोक सत्तेवर बसत आहे.आज शेतकरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर आले आहे.परंतु, त्यांनाही न्याय मिळत नाही.असे सांगून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला आहे, धम्मात सर्वाची प्रगती होईल .जगातील ज्या देशाने बौद्ध धम्म स्वीकारला आहे त्यांची उन्नति झाली आहे.
बाबासाहेब लंडन व अमेरिकाला शिक्षणासाठी असतांना त्या देशातील तापमान उणे शून्य असे अशा यावेळी सहकारी मित्र त्यांना औषध म्हणून दारु घेण्याचा आग्रह धरायचे. परंतु जीवन मरणाचा प्रश्न असूनही बाबासाहेबांनी कधी दारुला स्पर्श केला नाही. पण आज त्यांच्या जयंतीत कही महाभाग दारु पिऊन नाचतात.अशा लोकांचा राजरत्न आंबेडकर यांनी भाषणात जोरदार समाचार घेतला.कार्यक्रम नंतर राजरत्न आंबेडकर यांनी शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत गांगुर्डे, अरुण शिंदे,हरिभाऊ सोनवणे आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.