नाशिक – कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील आईसह बहीण व भावाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) सकाळी ७ वाजेदरम्यान उषाकिरण सोसायटी, संभाजी चौक, सिटी सेंटर मॉलजवळ घडली. या घटनेत आईचा मृत्यू झाला आबे. तर, बहीण व भावावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल सुहास शहा (वय ४३) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तनुष सुहास शहा (वय १७) आणि रिया सुहास शहा (वय १२) असे उपचार घेणार्या बहीण व भावांची नावे आहेत. कौटुंबिक वादातून शहा कुटुंबातील सोनल शहा, तनुष आणि रिया यांनी विष प्राशन केले. ही बाब सुहास प्रमोदकुमार शहा यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ उपचारार्थ तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करत सोनल शहा यांना मृत घोषित केले. तनुष आणि रियाची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे करत आहेत.