शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संपूर्ण अनलॉक!! प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सर्व उपक्रमांना परवानगी

by Gautam Sancheti
जानेवारी 28, 2021 | 6:08 am
in मुख्य बातमी
0
lockdown 1 750x375 1

नवी दिल्ली – कोरोना विषाणूपासून लागू झालेले अनेक निर्बंध अखेर दूर झाले आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रात अद्यापही निर्बंध राहणार आहेत. निर्बंध हटविल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे चालना मिळणार आहे.

 

केंद्रीय गृह मंत्रालयाने देखरेख , प्रतिबंध आणि सावधगिरीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून हा आदेश १ फेब्रुवारी पासून २८ फेब्रुवारी पर्यंत लागू राहणार आहे.

मागील चार महिन्यात सक्रीय रुग्णांच्या आणि नवीन रुग्णांच्या प्रमाणात झालेली घट यावरून देशभरात कोविड-19 चे संक्रमण रोखण्यात मिळालेले यश स्पष्ट दिसत असून ते  कायम ठेवण्यावर मार्गदर्शक सूचनांचा प्रामुख्याने भर आहे. म्हणूनच, महामारीवर  पूर्णपणे मात करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि गृह मंत्रालय  आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना / एसओपीचे काटेकोरपणे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे.

देखरेख आणि प्रतिबंध 

यासंदर्भात, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आवश्यक असल्यास प्रतिबंधात्मक क्षेत्राचे सूक्ष्म पातळीवर जिल्हा अधिकार्‍यांकडून काळजीपूर्वक सीमांकन करण्यात यावे. सीमांकन केलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन केले जावे.

विहित केलेल्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी ही स्थानिक जिल्हा, पोलिस आणि महानगरपालिका अधिकारी यांची असेल  आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करेल.

कोविड-योग्य वर्तन

राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार कोविड-19 च्या योग्य वर्तनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि मास्क घालणे, हात स्वच्छ करणे आणि शारीरिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना  करतील.

कोविड-19 योग्य वर्तणूक लागू करण्यासाठी, कोविड – 19 व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय निर्देशांचे  देशभर पालन केले जावे. .

विहित प्रमाणित कार्यप्रणालीचे  काटेकोरपणे पालन

खालील नमूद केलेल्या उपक्रमांव्यतिरिक्त प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर सर्व उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे,  जे खालील एसओपीचे काटेकोरपणे पालन करतील:

सामाजिक / धार्मिक / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक संमेलनांना हॉल क्षमतेच्या जास्तीत जास्त 50% पर्यंत परवानगी देण्यात आली आहे, आणि मोकळ्या जागेत मैदान/जागेचा आकार लक्षात घेऊन 200 व्यक्तींची कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. आता अशा मेळाव्यांना संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या एसओपीचे पालन करावे लागेल.

चित्रपट गृह  आणि नाट्यगृहांना आसन क्षमतेच्या 50% पर्यंत परवानगी आहे. आता त्यांना अधिक आसन क्षमतेसह काम करण्याची परवानगी देण्यात येईल, त्यासाठी गृह मंत्रालयासोबत सल्लामसलत करून माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत सुधारित एसओपी जारी करण्यात येतील.

खेळाडूंसाठी जलतरण तलावांच्या वापराला याआधीच परवानगी देण्यात आली आहे. आता सर्वांना जलतरण तलावांच्या  वापराची परवानगी देण्यात येणार आहे, त्यासाठी गृह मंत्रालयासोबत सल्लामसलत करून युवा कार्य व क्रीडा मंत्रालय सुधारित एसओपी  जारी करेल.

व्यवसाय ते व्यवसाय (बी 2 बी) प्रदर्शन हॉलला यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. आता सर्व प्रकारच्या प्रदर्शन हॉलला परवानगी देण्यात येईल, त्यासाठी गृह मंत्रालयासोबत सल्लामसलत करून वाणिज्य विभागामार्फत सुधारित एसओपी देण्यात येईल.

प्रवाशांसाठी अधिक संख्येने  आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय (एमओसीए) परिस्थितीचे आकलन करून त्याआधारे गृह मंत्रालयाशी (एमएचए) सल्लामसलत करून निर्णय घेऊ शकेल.

वेळोवेळी अद्ययावत केल्याप्रमाणे विविध कामांसाठी एसओपी विहित केलेले आहेत. यामध्ये प्रवासी रेल्वेचा प्रवास; हवाई प्रवास; मेट्रो गाड्या; शाळा; उच्च शैक्षणिक संस्था; हॉटेल आणि रेस्टॉरंट्स; शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि मनोरंजन पार्क; योग केंद्रे आणि व्यायामशाळा इ. चा समावेश आहे. या एसओपींची काटेकोरपणे अंमलबजावणी बजावणी करण्याची जबाबदारी ही संबधित अधिकाऱ्यांची असेल.

स्थानिक निर्बंध

शेजारी देशांसोबत केलेल्या करारा अंतर्गत  सीमेपलिकडून व्यापारासाठी तसेच आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत प्रवासी आणि माल वाहतुकीवर  कोणतेही बंधन नाही. अशा वाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगी / मान्यता / ई-परमिटची आवश्यकता नाही.

असुरक्षित व्यक्तींचे संरक्षण

65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, इतर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.

आरोग्य सेतू चा वापर

आरोग्य सेतू मोबाईल अॅपच्या वापरास प्रोत्साहन सुरूच ठेवले जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात अवघे ६८० कोरोना रुग्ण

Next Post

काय सांगता? UAN नंबरशिवायही चेक करू शकता PF!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
provident fund

काय सांगता? UAN नंबरशिवायही चेक करू शकता PF!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

shivsena udhav

नाशिकमध्ये मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, दोन नेत्यांमध्ये शाब्दिक वाद

ऑगस्ट 8, 2025
crime1

सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0304

राज्य शासनाने शहरासाठी ७ पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यात पहिलीच वेळ…मुख्यमंत्री

ऑगस्ट 8, 2025
fir111

ट्रान्स्पोर्ट कार्यालयात शिरून व्यावसायीकाकडे खंडणीची मागणी…तीन जणांवर गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
GxzEy8PW4AAqB 7

आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…खा. नरेश म्हस्के यांचे हे ट्वीट चर्चेत

ऑगस्ट 8, 2025
rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011