नाशिक – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याविरोधात सर्व संचालक एकवटले होते. गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत होत्या. सकाळे हे मनमानी कारभार करीत आहेत. ठराव बदलून घेत आहेत. संचालकांना विश्वासात घेत नाहीत, असे अनेक आरोप त्यांच्यावर केले जात होते. सकाळे यांच्यावर अविश्वास ठराव येण्याची चिन्हे होती. त्यापूर्वीच त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे.