जगभरात आज ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठांचे भावविश्व, त्यांच्या अडी-अडचणी आणि अन्य बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख….
एका थोर समाज शास्त्रज्ञांच्या मतानुसार दिवसभरात बहुतांश मनुष्याच्या मनात आनंद, हास्य, सेवा-सहकार्य भाव, प्रेम, परोपकार, त्याग, उत्साह अशा माणुसकी संबंधीत सद्भावना येतात, त्याचबरोबर राग, लोभ, द्वेष, दुःख, मत्सर, चिंता, आळस अशा नानाविध विपरीत, नकारात्मक किंवा कटू भावना देखील येत असतात. त्याचबरोबर ही भावभावनांची आवर्तने एक मिनिट किंवा किंबहुना एकदा सेकंदापासून चार ते पाच तासांपर्यंत टिकून असतात. मात्र कटू विचारांवर मात करून जो सद्भावना अधिक काळ टिकवून ठेवेल तोच चांगला मनुष्य होय, असा मनुष्य संत पदाकडे वाटचाल करीत असतो.
सध्याचा काळ तर ताणतणाव , दुःख आणि चिंतेने भरलेला आहे त्यातच कोरोनासारखे महाभयानक संकट संपूर्ण मानव जाती पुढे उभे ठाकले आहे. त्यामुळे भय किंवा चिंता ही भावना सध्या जगभरात व्यापून आहे ,अशा परिस्थितीत जीवन चक्र सुरू आहे .मनुष्याला सर्वात मोठी चिंता किंवा भय कशाचे वाटत असेल तर मृत्यूचे, असे म्हटले जाते. आयुष्याच्या संध्याकाळी त्याचे भय अधिक वाटू लागते. परंतु ज्या प्रवासाचे शेवटच्या ठिकाणी नेमके कधी येणार आहे हे आपल्याला ठाऊक नाही त्याबद्दल अकारण चिंता व्यक्त करून जगणे काही सुसाह्य होणार नाही ,त्याकरिता ज्येष्ठ नागरिकांची निरामय आनंदी जीवन जगावे म्हणून दि.१ ऑक्टोबर हा दिवस जगभरात ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या घरातील, नातेवाईकांतील, परिसरातील किंवा संपर्कातील ज्येष्ठ नागरिकांना रोजचे आयुष्य जगताना आनंद मिळावा म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे .
जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येकालाच वार्धक्य हे अपरिहार्य आहे ,वार्धक्य हा आजार किंवा रोग नव्हे तर तो एक परिपूर्ण आयुष्य जगण्याचा सन्मान आहे ,परंतु सध्या धावपळीच्या काळात सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे सामूहिक न राहता वैयक्तिक आणि व्यक्तिकेंद्रित बनले आहे, त्यामुळे प्रत्येक जण जणू काही आपल्या कोषात आपल्या कोषात काही आपल्या कोषात आपल्या कोषात जणू काही आपल्या कोषात आपल्या कोषात काही आपल्या कोषात आपल्या कोषात जगत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य दीनवाणे बनले आहे. त्यामुळे त्यांना संध्याछाया भिवविती हृदया… असे वाटू लागते. आपले उतारवयातील आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांची धडपड सुरू असते. सहाजिकच समाजाने ज्येष्ठ नागरिकांची सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, वृद्धाश्रम नको तर विरंगुळा म्हणून ठिकाणी नाना नानी पार्क व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात. तसेच कुदुंबात आणि समाजात सन्मान मिळाला तर चालेल, पण आपमान होऊ नये, अशी अपेक्षाही ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात.
वृद्धांची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संख्या जगभरात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण वैद्यकीय क्षेत्रात लागणारे नवनवीन शोध व सामाजिक परिस्थितीत होणारी निरंतर सुधारणा यामुळे उपेक्षित आयुष्यमान वाढत चालले आहे. समाजातील अन्य घटक प्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या असतात, त्याकडे जगभरातील देशांचे लक्ष वेधावे यासाठी दि. १४ सप्टेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत सर्वप्रथम दि. १ ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर लगेचच पुढील वर्षापासून म्हणजे इ.स. १९९१ पासून जगातील या सर्व देशात हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. वार्धक्यातील समस्या व त्यातील जोखीम असणाऱ्या महिला, गरीब व्यक्ती आणि वृद्ध अपंग व्यक्ती अशा सर्वांच्या विकासासाठी परिणामकारक उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करणे, अशी व्यापक संकल्पना या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात येते.
गेल्या शंभर वर्षातील भारतातील सरासरी आयुष्यमान तीन पट वाढ झाली आहे. इ.स. १९०१ मध्ये भारतात पुरुषांचे सरासरी आयुष्यमान २३.६३ वर्ष तर स्त्रियांचे २३.९६ वर्षे इतके होते. तर सन इ.स. २००१ च्या आकडेवारीनुसार पुरुषांचे आयुष्यमान ६२.८० तर स्त्रियांचे ६४ वर्षे आहे. जगण्याचा काळ वाढला तशा साधारण वेगवेगळ्या समस्या देखील वाढल्याचे दिसून येतात. आपल्या देशात आणि राज्यात नागरिकांना शासनाकडून विविध सेवा, सुविधा आणि सवलती देण्यात येतात.वैद्यकीय सेवा ,प्रवास सेवा, पेन्शन सेवा आदी अनेक सवलतींचा यात समावेश आहे.परंतु या सोयी सवलतींचा फायदा थेट ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना याबाबत थोडीफार या सवलतींची माहिती असते.मात्र अद्यापही ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना याची माहिती नसते किंवा त्यांच्या पर्यंत या सुविधा पोहचतच नाहीत.
जागतिक लोकसंख्येचा विचार करता तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचे गुणोत्तराचे प्रमाण बघितल्यास आपल्या देशात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. परंतू ही परिस्थिती बदलून पुढील दहा वर्षात जगातील २० टक्के ज्येष्ठ नागरिक भारतात असतील. त्यामुळे जपान आणि अन्य काही पाश्चात्य राष्ट्रे प्रमाणे आपला देश देखील वृद्धांचा म्हणून ओळखला जाऊ शकतो, परंतु देशात ज्येष्ठ नागरिक वाढले म्हणून चिंता करण्याचे कारण नाही, असे काही समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ सांगतात.ज्येष्ठ नागरिकांनी केवळ शारीरिक तक्रारी करीत बसण्यापेक्षा मानसिक दृष्ट्या सक्षम राहील्यास यात उर्वरित आयुष्य सुसह्य होते. आमच्या वेळेस असे नव्हते! काय जमाना बदलला बघा? आमचे केस काय उगाच पांढरे झाले काय? असे म्हणत राहण्यापेक्षा आपल्या स्वभावात कालानुरूप थोडाफार बदल करून आनंदी जीवन जगण्यात खरी मजा आहे. तसेच काही प्रमाणात आता ज्येष्ठांनी देखील आपल्या दैनंदिन जीवन आणि विचारांमध्ये बदल केलेला असून अशी जाणीव जाग्रुती अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये आता दिसून येत आहे. सहाजिकच भुतकाळ विसरून ज्येष्ठ नागरिक स्वतःला विधायक कामात गुंतून घेताना दिसतात. नाशिक शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली असता असे दिसून आले की, सध्या कोरोनाच्या संकटामुळे त्यांना थोडे सुध्दा घराबाहेर पडणे शक्य होत नाही त्यामुळे त्यांची मानसिक आणि शारीरिक कोंडी होत आहे.
भारतात अनेक समस्या असून त्यात ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या ही देखील काही समस्या वाटू शकते. परंतु गेल्या काही वर्षात भारतात नागरिक सुविधा व साधन सामुग्री उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिकांचे जगणे सुसह्य झाले आहे. पूर्वी साठ वर्ष जगणे फार झाले, असे समजले जात होते. परंतु या विचारांमध्ये आता बदल होत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात सरासरी वयोमर्यादा 77 असून त्यापेक्षा जास्त आयुमर्यादा असलेले स्वीडन व अन्य 25 देश जगात आहेत. ज्येष्ठ नागरिक म्हणजे केवळ सेवानिवृत्त कर्मचारी नसून त्याचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असे सर्वच ज्येष्ठ नागरिक असतात. त्यात शेतकरी, कष्टकरी, मजूर, महिला वर्ग यांच्या सर्व क्षेत्रातील लोकांचा समावेश होतो .वयाच्या ज्येष्ठतेनुसार किरकोळ शारीरिक तक्रारी वर मात करून मानसिक समर्थता वाढविल्यास आपल्या वयाच्या कार्यक्षम व्यक्तीकडे बघून नव्याने जगण्याची उमेद जागविली तर आपले दुःख कमी होऊ शकते, असे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या संदर्भात व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक विधायक कामात गुंतवून घेऊ शकतात, कुणी बागकामाचा छंद जोपासतात, कुणी लेखन, गायन, वादन कला जोपासता ,तेव्हा मनाला एक वेगळ्या प्रकारचे समाधान लाभते . ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनातील पुस्तकाचे लेखन करणारे प्रा. यशवंत पाटील सर यांनी नमूद केले की, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक स्थिती भिन्न असते. जर मानसिक स्थिती सुदृढ असेल, तर सर्व परिस्थितीवर मात करता येते. ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे वेगवेगळे आजार होय. यात प्रामुख्याने दृष्टिदोष ,सांधेदुखी, मज्जासंस्थेचे विकार, हृदयरोग , मुत्रसंस्थेचे विकार ,त्वचारोग, मनोविकार, बहिरेपणा, आदींच्या समस्या होय. त्याचप्रमाणे. त्याचप्रमाणे मधुमेह, लठ्ठपणा आधी देखील आजार आढळून येतात .त्यावर मात करण्यासाठी आहार-विहार मात करण्यासाठी आहार-विहार योग्य हवा. तसेच काही योगासने व हलकासा व्यायाम करायला हवा. त्याशिवाय निरामय व आरोग्य संपन्न जगण्यासाठी तरुणपणापासूनच त्याचा विचार करून सुयोग्य नियोजन करायला हवे, भावी गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आर्थिक तसेच इतर बाबींचे नियोजन करायला हवे, खायला ऊठणारच वेळ कसा घालवायचा त्याचे उत्तर समाजसेवा, विविध छंद, आवड आणि अध्यात्म अशा एखाद्या स्वरूपात नक्की देता येईल. तर मग चला आज आनंदी जगूया आणि उद्या ( भविष्यात ) आनंदमय राहण्याचा विचार करू या…..
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)