मुंबई – या वर्षाच्या शेवटच्या महिन्याची सुरुवात झाली असली तरी लॉकडाउनमुळे यंदा वाहन निर्माता कंपन्या नवीन वाहने बाजारात आणू शकल्या नाहीत. परंतु नवीन वाहनांचे लॉन्चिंग मात्र सुरूच आहे. चला तर तुम्हाला अशा काही कारची माहिती देणार आहोत ज्यांची किंमत ६ लाखांपेक्षाही कमी असणार आहे.
टाटा एचबीएक्स:
देशातील सर्वात अग्रेसर असलेली टाटा मोटर्स ही कंपनी सातत्याने आपल्या पोर्टफोलियोचा विस्तार करण्याचे काम करते आहे. ज्यात कंपनीच्या अनेक नवीन गाड्या लॉन्च करण्यात येणार असून पहिली गाडी टाटा एचबीएक्स असणार आहे. लॉन्चिंगच्या वेळी गाडीचे नाव हार्निबल असे असू शकते. लेह दरम्यान या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली. या गाडीची किंमत ६ लाखांच्या जवळपास असेल.
रेनो किंगर:
भारतात कमी बजेट आणि भरपूर स्पेस असलेल्या गाड्यांची मागणी बघता सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही ची सुरुवात झाली. फ्रान्स ची कंपनी रेनो लवकरच सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही किंगर ही नवीन गाडी लॉन्च करणार आहे. ६ लाखांच्या आसपास किंमत असलेली किंगर ही मारुती सुजुकी विटारा ब्रेजा, हुंडई वेन्यू, महिंद्रा एक्सयूव्ही ३००, किआ सेल्टॉस आणि अर्बन क्रूजर या गाड्यांच्या खालोखाल असेल.
मारुती सेलेरियो:
मारुती सुजुकी अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या त्यांच्या सेलेरियो या गाडीला पुन्हा एकदा नव्या स्वरूपात घेऊन येणार आहेत. ही नवीन सेलेरियो कंपनीच्या HEARTECT प्लॅटफॉर्म वर आधारित असेल. या कार मध्ये १.० लिटर K-Series पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार असल्याने ६६bph पावर आणि 90Nm टार्क तयार करण्याची क्षमता त्यात असेल. नवीन स्वरूपातील सेलेरीयोची किंमत ५ लाखांपासून असेल.