नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. अनेक दशकांनंतर ही यात्रा भरणार नाही. निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरवण्यासाठी परवानगीचा अर्ज तहसीलदारांकडे केला होता, मात्र जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव थांबलेला नसल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यात्रेला परवानगी नाकारली. त्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. या यात्रेची ऐतिहासिक परंपरा आहे. मात्र, ती यंदा खंडित झाली आहे.