सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संतप्त शेतकऱ्यांची ‘केळझर’वर धडक; कालव्याचे पाणी बंद करण्यास भाग पाडले

by India Darpan
सप्टेंबर 20, 2020 | 9:55 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200919 WA0055 e1600522738844

डांगसौंदाणे, ता. सटाणा – केळझर कालव्याच्या गळतीमुळे शेतपिकांचे आतोनात नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर केळझर धरणावर धडक दिली. तसेच, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कालव्याचे गेट बंद करण्यास भाग पाडले.
 केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने वाहून जाणारे पूर पाणी केळझर कालव्यात टाकून पुढे चारी क्र.८ मध्ये टाकण्याची चाचणी घेण्यासाठी सोडण्यात आले होते. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालवा दुरुस्त न करताच पूर पाणी कालव्यात टाकले. त्यामुळे दगडी साकोडे, डांगसौंदाणे, गव्हाणेपाडा येथे प्रचंड पाणी गळती होऊन शेती व लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकरी संतप्त झाले.
गेल्या काही दिवसांपूर्वीच आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने कालवा दुरुस्त होईपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना त्यांनी पाटबंधारे विभागाला केल्या होत्या. मात्र पाटबंधारे विभागाने कालव्याचे पाणी बंद न केल्याने शेतकरी आक्रमक झाले. दगडी साकोडे येथे कालव्याच्या गळतीचे प्रमाण जास्त असून दुरुस्तीचे टेंडर निघूनही काम संथगतीने सुरू आहे. हे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याची तक्रार ग्रामस्थांनी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे  केली आहे. तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी कळझर धरणावरच धडक दिली. आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कालव्याचे गेट बंद करण्यास भाग पाडले. या प्रसंगी हेमंत चंद्रात्रे,मनोहर सोनवणे, दशरथ बागुल, अर्जुन भोये,शंकर बहिरम, हिरामण सोनवणे, जनक सोनवणे, यशवंत गांगुर्डे यांच्या सह डांगसौंदाणे, साकोडे, गव्हाणेपाडा गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.
IMG 20200919 WA0056
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

व्यंगचित्र – गजरमलकाकांचे फटकारे

Next Post

नाशिक कोरोना अपडेट- १३८७ नवे बाधित. १६४२ कोरोनामुक्त. १६ मृत्यू

India Darpan

Next Post
Corona Virus 2 1 350x250 1

नाशिक कोरोना अपडेट- १३८७ नवे बाधित. १६४२ कोरोनामुक्त. १६ मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011