मुंबई – शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात येथील ग्रँड हयातमध्ये भेट झाली असून यामुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे. ही भेट कुठल्या मुद्द्यावर झाली, त्यात काय चर्चा झाली याबाबत सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात आहेत. ही भेट तब्बल दोन तास चाचली असून ती अराजकीय असल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार, त्यात शिवसेनेची भूमिका, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण, बिहार निवडणूक, कोरोना महामारी यापैकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. तर, सामनाच्या मुलाखतीसाठी फडणवीस यांची भेट घेतल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी ऐवढा वेळ चर्चा झाली तर मुलाखत किती वेळ चालणार असे प्रश्नही सोशल मिडियात उपस्थित केले जात आहेत. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का तसेच राज्यात सत्तापालट होणार का यासह अनेकविध चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यामुळे नजिकच्या काळात काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राऊत यांच्या या ट्विटमुळे सर्वत्र चर्चांचा जोर