लेखकाने सामाजिक भान ठेवून लिहावे-डॉ.राजेंद्र मलोसे
…
…
चांदवड- मालेगाव येथील कवी व लेखक संजय मुकुंदराव निकम यांच्या ‘ठिणगी’ या कादंबरीचे व ‘आभाळमाया’ या नगारा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहाचे चांदवड येथे सुप्रसिद्ध साहित्यिक व कादंबरीकार डॉ.राजेंद्र मलोसे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
लेखकाने सामाजिक भान ठेवून लिहीत राहिले पाहिजे.अभिव्यक्ती हा लेखकाचा संवेदनशील गुणधर्म असतो.संजय निकम यांचे लेखन आत्मभानातून प्रकट होऊन सामाजिक जाणिवेच्या स्पर्श करते असे मत या वेळी जेष्ठ कादंबरीकार डॉ.राजेंद्र मलोसे यांनी व्यक्त केले. कवी संजय निकम यांनी लिहिलेल्या ‘आभाळमाया’या काव्यसंग्रहाचे कवी ,गीतकार विष्णू थोरे यांच्या हस्ते प्रकाशन केले. याप्रसंगी कवी रावसाहेब जाधव, कवी,रवींद्र देवरे,कवी सागर जाधव उपस्थित होते.