मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेता संजय दत्त आणि परिवार त्याच्या आजारणामुळे चिंतेत होते. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला फुफ्फुसाच्या कँसरचे निदान झाले होते. परंतु संजय दत्त आता कँसर फ्री झाल्याचे समजते आहे. याबाबत स्वतः संजय दत्तने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
‘आज तुम्हा सर्वांसोबत आनंदाची बातमी शेअर करतांना मला विलक्षण आनंद होत आहे, धन्यवाद !’ अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे. गेले काही आठवडे कँसर पासून त्रस्त होतो, मात्र आता घाबरण्याचे कारण नसून पूर्णपणे बरा झालो असल्याची माहिती त्याने चाहत्यांना दिली आहे. ‘कॅन्सरची लढाई यशस्वीपणे पूर्ण करून आल्याचा आनंद आहे, आपणा सर्वांच्या साथीने आणि आशीर्वादाने बरा झालो आहे, त्यासाठी सर्वांचे आभार’ अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात संजय दत्तने याबाबत माहिती दिली होती. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालय येथे किमोथेरपी केली असून त्यानंतर ‘शमशेरा’ आणि ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात केली आहे.