मुंबई – एखाद्याचा विश्वास असो वा नसो पण राशी आणि ग्रहांचे तंत्र जाणून घेण्यात प्रत्येकाला रस असतो. संक्रांतीच्या काळात त्याची विशेष उत्सुकता असतेच. पौष महिन्यात जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा उत्सव आपण साजरा करतो. या दिवसांमध्ये सूर्य हा धनू राशीला सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांत १४ जानेवारीला साजरी होत असते. या दिवशी सूर्यदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व असते. ज्योतिष्याचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाचवेळी पाच ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहेत.
संक्रांतीचा शुभ मुहूर्त
मकर संक्रांतीला सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.४६ पर्यंत पुण्य काळ आणि सकाळी ८ ते ८.२७ या कालावधीत पुण्यकाळ असेल. या काळात स्नान करून दक्षिणा दिल्यास विशेष फलप्राप्ती होते, असे ज्योतिष्यांचे म्हणणे आहे.
पुण्यकाळ ८ तासांचा
ज्योतिष अभ्यासकांनी सांगितले आहे की, यंदा मकर संक्रांतीचा पूर्ण काळ हा ८ तासांचा राहणार आहे. यंदा सूर्य, चंद्र, शनी, बुध आणि गुरु हे पाच ग्रह मकर राशीत प्रवेश करीत आहेत.
शनी देवाची पूजा
हिंदू शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान, व्रत आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांपासूनच ऋतूंमध्ये बदल व्हायला लागतो. त्यानंतर वसंत ऋतूचे आगमन होत असते. अशाच दिवस मोठा आणि रात्र छोटी व्हायला लागते. असे म्हणतात की, या दिवशी सूर्यदेव शनीदेवांच्या घरी जातात त्यामुळेच या दिवशी शनी देवाची सुद्धा पूजा केली जाते.