नाशिक – श्री क्षेत्र सप्तशृंगगड व कळवण तालुक्याच्या परिसरात मोठ्या संख्येने कोविड-१९ संदर्भीय रुग्ण आढळून आल्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत, सप्तशृंगगड यांनी जा क्र ०४/२०२१ नुसार जनता कर्फ्यू संदर्भात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेने कोरोना संसर्ग टाळणे तसेच स्थानिक नागरिक व भाविक वर्गाच्या आरोग्य व जनसुरक्षेच्या हेतूने घेतलेल्या निर्णयानुसार श्री भगवती मंदिर दर्शन सुविधा ही गुरूवार १ एप्रिल ते सोमवार ५ एप्रिल पर्यंत संपूर्णतः बंद असतील. मात्र श्री भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा व आरती निर्धारित वेळेत सातत्यपूर्वक सुरू असेल. तरी भाविकांनी सदर नोंद घेवून विश्वस्त संस्थेसह जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य देवू करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.