औरंगाबाद – महानुभाव पंथाचे अत्यंत पवित्र तीर्थस्थान असलेले श्रीक्षेत्र जाळीचा देव (जयदेववाडी, जि. जालना) या तीर्थक्षेत्राचे ठिकाणी कायमच होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून या ठिकाणी आरोग्याचे दृष्टीने ग्रामीण रुग्णालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करून नागरिकांच्या आरोग्याची तसेच मूलभूत सेवा पुरविणे बाबत मागणीचे निवेदन श्री प्रभु प्रतिष्ठान, नाशिक तसेच अखिल भारतीय महानुभाव वासनिक परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
श्री प्रभु प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश डोळसे आणि अन्य पदाधिकारी यांनी यासंबंधी मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री यांना निवेदन पाठविले असून या निवेदनात म्हटले आहे की,आम्ही महानुभाव पंथीय साधक आहोत. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू हे संपूर्ण महाराष्ट्र भर पायी फिरून समाजातील जीव जातीच्या आत्मकल्यानासाठी तसेच समाजातील जातीय व्यवस्था यासह अनेक कारणांचे हितावह मार्गदर्शन करत. त्यांनी अनेक गावोगावी खेडोपाडी जाऊन अनेक मार्गदर्शन केले होते. अश्याच प्रकारे महाराष्ट्र राज्यात फलटण, रिद्धपुर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, जालना, बीड, नागपूर, गोंदिया, भंडारा, नगर, जळगाव, अकोला, यवतमाळ, नांदेड, यासह महत्वाच्या जिल्ह्यातील ठिकाणासह इतर ही अनेक खेडोपाडी जवळ जवळ साडे सोळाशे ठिकाणी महानुभाव तीर्थ स्थाने आहेत. या तीर्थक्षेत्र च्या ठिकाणी महानुभाव पंथीय साधक हे शक्य होईल, तसे दर्शनासाठी सातत्याने जात असतात. त्याच माध्यमातून श्रीक्षेत्र जाळीचादेव अर्थातच जयदेव, ता भोकरदन, जि. जालना हे महानुभाव पंथियांची नव्हे इतर भाविकांच श्रद्धेचे ठिकाण असून याठिकाणी माघी पौर्णिमा अर्थातच दांडी पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने जवळ जवळ पंधरा दिवस भाविकांची रेलचेल असते. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असताना यात्रेच्या निमित्ताने पांच लाखाच्या पेक्षाही भाविक येतात.
तसेच इतर दिवशी भाविकांची येजा सुरूच असते. याठिकाणी अनेक आश्रम असून आश्रममध्ये संत महंत साधक तसेच त्याचा शिष्यांसह हजारोंच्या वर महानुभाव पंथीय साधक व तसेच नामधारक वासनिक व पुजारी परिवार हे वास्तव्यकरून राहत आहे.
याठिकाणी वर्षभरात अनेक उपक्रम होत असतात.या निमित्ताने वर्षभर भाविकांची रेलचेल तथा ये जा सुरू असते. जाळीचादेव पासून जवळच अनेक लहाण मोठी गाव आहेत तिथं ही पंथीय तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी मोठया संख्येने जनसमुदाय जमत असतो. मात्र या भागात आरोग्य केंद्र नाही. सध्या देशासह जगभरात अनेक साथीचे आजाराने दररोजच थैमान घालत आहे. आज पावेतो मठ मंदिरे बंद होती हे ठीक परंतु यापुढे ती लवकरच सुरू होतील व भाविकांची दर्शनासाठी येजा सुरू होईल. अनेक देवस्थानाचा विचार करता याठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे. मात्र याठिकाणी आरोग्यासाठी कोणतीही सुविधा सरकारने अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. श्रीक्षेत्र जाळीचादेव याठिकाणी लवकरात लवकर भाविकांच्या व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्राथमिक उपकेंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय ची सुविधा उपलब्ध करून देऊन भाविकांची गैरसोय टाळावी. कारण जाळीचादेव येथून लगत चा बुलढाणा शहर हे ३० किलोमीटर व अजंठा शहर हे ३० किलोमीटर आहे.त्यामुळे अति तत्काळ सेवेसाठी याठिकाणी होणाऱ्या गर्दीचा विचार करून याठिकाणी आपण नक्कीच ही आरोग्यासाठी ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सदर मागणी अर्जाचे निवेदन संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री , महसूलमंत्री, ग्रामविकास मंत्री आदिंना पाठविण्यात आले आहे.