नवी दिल्ली – श्रीलंका सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बुरख्यावर बंदी आणणार असून एक हजाराहून अधिक मदरसे व इस्लामिक शाळा देखील बंद राहतील, श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री शरथ वीरसेकरा यांनी या निर्णयाची माहिती दिली.
वीरसेकरा म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी त्यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा आधार म्हणून मुस्लिम महिलांनी संपूर्ण चेहरा झाकून घेण्यास मनाई करावी, असे नमुद करीत या विधेयकात मान्यता देण्यात आली आहे.
कॅबिनेट सील नंतर संसद याबाबत कायदे करू शकते. वीरसेकरा पुढे म्हणाले की , मुस्लिम मुली आणि स्त्रिया सुरुवातीच्या काळात देशात कधीही बुरखा घातल नव्हत्या . मात्र गेल्या काही वर्षांत त्यांचा याकडे कल वेगाने वाढला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाढती धार्मिक कट्टरता असून हे थांबविणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी बर्याच देशांनी बुरखा बंदी घातली होती. नुकतेच स्वित्झर्लंडनेही जनमत संग्रह करून बुरखा घालण्यास बंदी घातली होती. श्रीलंकेत एक हजार मदरसे आणि इस्लामिक शाळा बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे, कारण त्यांच्या कडून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची खिल्ली उडविली जात आहे. 2019 मध्ये बौद्ध बहुल श्रीलंकेत चर्च आणि हॉटेलवर हल्ला झाल्यानंतरही बुरखा घालण्यास अस्थायी बंदी घालण्यात आली होती.