नवी दिल्ली – वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाने अँटिगामध्ये खेळल्या जाणार्या वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत श्रीलंकेला आठ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात श्रीलंकेच्या डावा दरम्यान मैदानामध्ये सलामीवीर दानुष्का गुनाथिलका याला मुद्दाम बाद करण्यात आले. त्यामुळे खुद्द अम्पायरच या सामन्यात रडीचा डाव खेळत असल्याची जगभरात चर्चा आहे.
या सामान्यात वेस्ट इंडीज संघाच्या अनुभवी खेळाडू गोलंदाज किरोन पोलार्ड यांच्याकडून गुनाथीलका यांच्या फलंदाजीविरूद्ध अपील करण्यात आले. मात्र यावेळी पंचाने योग्य निर्णय न घेतल्याबद्दल त्याची चौकशी केली जात आहे, कारण गुनाथीलका याला मुद्दाम बाद केले, हे रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले. याचा संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
श्रीलंकेच्या डावाच्या 22 व्या षटकात षटकात वेस्ट इंडीजचा कर्णधार किरोन पोलार्ड हा गोलंदाजी करत आणि गुनाथीलका हा फलंदाजी करीत होता. पोलार्डचा बॉल खेळल्यानंतर गुनाथिलका याने धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण आपण धावू शकणार नाही, असे जेव्हा त्याला वाटले तेव्हा तो पुन्हा क्रीजवर जाऊ लागला. मात्र क्रीजवर परत येताना तो धडकला. त्यानंतर पोलार्डने रागाने गुनाथीलकाकडे पाहिले आणि या संबंधी पंचांकडे तक्रार केली. तेव्हा नंतर पंचांनी त्याला बाद केले. वास्तविक तो बाद झालाच नव्हता. पंथाच्या या एकतर्फी निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटले.
दरम्यान, श्रीलंकेचा संघ या सामन्यात पराभूत झाला, पण गुणातिलकाने सामन्यात शानदार डाव साकारला आणि 61 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 55 धावा फटकावल्या. संघाला दमदार सुरुवात करत त्याने दिमुथ करुणारत्ने याच्यासमवेत पहिल्या विकेटची शतकी भागीदारी केली.
संघाने निर्धारित षटकांत 232 धावा केल्या आणि वेस्ट इंडिज संघाला 233 धावांचे लक्ष्य दिले. मात्र घरच्या मैदानावर विंडीज संघाला हे लक्ष्य गाठण्यात कोणतीही अडचण नव्हती आणि त्यांनी दोन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. सलामीवीर शाई होपने शानदार शतक ठोकले. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.