संस्कारमाला – भाग ५ – सावित्री व्रत – कौटुंबिक संवाद
१) श्यामच्या वडिलांना त्यावेळी जसे संकट आले, आज तुमच्या वडिलांच्या जीवनात दुसरे कोणते संकट आले होते काय..? मोठे आजारपण, अपघात, मोठी फसवणूक, चोरी, दरोडा, आग, जाळपोळ, दंगल, सर्पदंश, नोकरीवरून अचानक काढून टाकणे, एखादा आळ येऊन बदनामी होणे, धंद्यात मोठे नुकसान होणे, कर्ज खूपच वाढून वसुली येणे यांसारखी अनंत संकटे येऊ शकतात..
असेच तुमच्या परिवारावर कोणते संकट आले होते, ते आई-वडिलांना विचारून आम्हाला लिहून कळवा पाहू.
३) तुमच्या कुटुंबातील लहानमोठ्या संकटात तुम्ही काय मदत केली पाहिजे असे तुमच्या आई-वडिल,आजी-आजोबा यांना वाटते, ते विचारून सांगा पाहू.

प्रयोगशील शिक्षक
पालकांना उपक्रमविषयक माहितीपर दोन शब्द..
दर शुक्रवारी कौटुंबिक संवादात विद्यार्थी प्रश्न विचारतील, आई-वडिल, आजी-आजोबा आणि कुटुंबातील इतर जण उत्तरे देतील. कुटुंबात आईच्या उपदेशानुसार वातावरण निर्मिती घडवून यावी हीच यामागील अपेक्षा आहे.
