श्यामची आई संस्कारमाला – भाग ३ – सावित्री व्रत – आईचा उपदेश
बाळा श्याम, कष्ट करायची, आई-वडिलांची कामे करण्याची, काम करण्याची लाज बाळगू नकोस.
चूगली-चहाडी, पाप करण्याची लाज बाळगली पाहिजे.
पालकांना उपक्रमविषयक माहितीपर दोन शब्द..
कालचा कृतियुक्त खेळ सर्वांसाठी होता. पण गुरुवारी आईचा उपदेश फक्त आई आणि मुलांसाठीच आहे. आई हा प्रथम गुरु मानून या घटकाची निवड केली आहे. उपदेश थोडासाच असतो. उपदेशाचे डोस हे थोडेच आणि आठवड्यातून एकदाच मुलांना पाजू या. डोस जास्त झाल्यावर मुले जवळ थांबणार नाहीत. पण, उपदेश केलाच पाहिजे. श्यामच्या आईने उपदेश केला, मग आजच्या सुशिक्षित आईने का करू नये? आईचा उपदेश मुलांना कराच.. KEEP IT UP..GO AHEAD..
आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत