श्यामची आई संस्कारमाला- भाग ३- सावित्री व्रत- कृतीयुक्त खेळ
एकजण श्यामची आई, श्यामचे वडील, दोन-तीन दरोडेखोर आणि एकजण श्याम बनून नाटिका बसवायची का?
दरोडेखोरांचे लुटणे हा पहिला भाग,
आईने नवस केला हा दुसरा भाग
आणि आईने श्यामला उपदेश केला हा तिसरा भाग
अशी लहानशी नाटिका बनवली तर ..?
—
पालकांना उपक्रमविषयक माहितीपर दोन शब्द..
श्यामची आई पुस्तकातील गोष्ट सोमवारी आणि सोपे प्रश्न मंगळवारी पाहिल्यावर आज ACTVITY GAMES पाहूया. श्यामची आई, श्याम आणि वडील आहेतच प्रत्येक घरोघरी. हे मुख्य पात्र आहेत. इतर पात्र जसे जमतील, तसे काम करवून घ्यावे. नाहीच तर जेवढे पात्र उपलब्ध आहेत, त्यात काम उरकून घ्यावे. दोन-तीन दरोडेखोर असो की नसो, पण खेळ झालाच पाहिजे. कारण पतीवर संकट आले की पत्नीलाही काहीतरी करण्याची उर्जा निर्माण झाली पाहिजे, जबाबदारीची जाणीव झालीच पाहिजे. याचबरोबर, माझ्यावर संकट आले की सर्वात पहिल्यांदा माझी पत्नीच धावून येते, हेदेखील पतीला कळले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे, आई-वडिलांना एकत्रित आणून होणारे असे सोपे खेळ झालेच पाहिजे. हो की नाही?