नाशिक – के. के. वाघ इंजिनिअरिंग शिक्षण व संशोधन संस्थेच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात ए.आय.सी.टी.ई. यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय शॉर्टटर्म प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले.
प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने तीन टप्प्यात घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली. यातील तिसरा टप्पा १४ ते १८ सप्टेंबर २०२० या कालावधीत यशस्वीपणे पार पडला. ‘स्मार्ट ग्रीड इन आयओटी अँड ऍडवान्सड पॉवर इलेक्ट्रॉनीक्स’ याविषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यात एकूण २५० जण सहभागी झाले होते. यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक, प्राध्यापक, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमात बेल्झ इन्स्ट्रुमेंट्सचे सल्लागार डॉ. आर. पी. देशपांडे, एस.व्ही.एन.आय.टी. सूरतचे प्रा. डॉ. के. व्ही. प्रवीण कुमार आणि प्रा. डॉ. पी. कुंडू, तसेच सल्लागार अभियंता डॉ. ओ. जी. कुलकर्णी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडकीचे प्रा.डॉ.अविक भट्टाचार्य, भारतीय तंत्रज्ञान संस्था वाराणसीचे प्रा. डॉ. मित्रेश कुमार वर्मा, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे प्रा. डॉ. एस. ए. सोमण आणि प्रा. डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, वाय.सी.सी.ई. नागपूरचे डॉ. पी. एम. मेश्राम आणि सीमेन्स इंडियाचे विक्रांत संखे यांनी मार्गदर्शन केले. याद्वारे स्मार्ट ग्रीड क्षेत्रातील विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व विश्वस्त समीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर, विभाग प्रमुख डॉ. बी. ई. कुशारे, डॉ. रविंद्र मुंजे, प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. सुनिता खैरनार आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.