मुंबई/नवी दिल्ली – वाढती महागाई पाहता मुलांचा उच्च शिक्षणाचा खर्च करणे पालकांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. अशा परिस्थितीत पालकांना एकमेव पर्याय म्हणजे बँकांतून शैक्षणिक कर्ज घेणे होय. भारत आणि परदेशातील काही संस्थांकरिता जवळपास सर्व बँकांकडून शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे. कोणत्या बँकांचे शैक्षणिक कर्जाचे कमी व्याजदर आहेत, हे जाणून घेऊन घेऊ…
बँकांचे शिक्षण कर्ज पालक किंवा विद्यार्थ्यांद्वारे घेतले जाऊ शकते, ते कोर्स पूर्ण झाल्यावर परतफेड केले जाऊ शकते. कर्ज, व्याज दर आणि सममूल्य मासिक हप्ता (ईएमआय) आणि इतर अटी व शर्ती बँक ते बँक वेगवेगळ्या असू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडिया
एसबीआयकडून आठ वर्षांकरिता १० लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी १३,५५९ रुपये ईएमआय येईल, तर एचडीएफसी बँकेचा १४,९३७ रुपये ईएमआय येईल. एसबीआयचा व्याज दर ६.८५ टक्के आणि एचडीएफसी बँकेचा व्याज दर ९.५५ टक्के आहे.
बँक ऑफ बडोदा
व्याज दर ६.७५ टक्के म्हणजे सर्वात कमी आहे. युनियन बँक ६.८० टक्के, सेंट्रल बँक ६.८५ टक्के, बीओआय, ६.८५ टक्के, एसबीआय, ६.८५ टक्के, पीएनबी ६.९० टक्के, आयडीबीआय बँक ६.९० टक्के, कॅनरा बँक, ६.९० टक्के, इंडियन बँक, ७.१५ टक्के असा व्याज दर आहे.
कर्जाचे निकष काय?
अनेक बँकांकडून महाविद्यालय, शाळा, वसतिगृह फी, पुस्तके, शैक्षणिक उपकरणे, गणवेशासाठी कर्ज देतात. तसेच परीक्षा शुल्क, ग्रंथालय, प्रयोगशाळा शुल्क, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा खर्च, इतर कोणताही खर्च म्हणजे अभ्यास दौरे, प्रकल्पांचे काम, प्रबंध आदी आवश्यक असल्यास कोर्स पूर्ण करण्यासाठी, वाजवी किंमतीवर संगणक खरेदीसाठी कर्ज देतात.