नाशिक – कोथिंबीर विक्रीस आलेल्या शेतकऱ्याशी अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना अखेर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने निलंबित केला आहे. योग्य भाव देत नसल्याने कोथंबीर परत घेऊन जाण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला. त्याचा राग आल्याने व्यापाऱ्याने अरेरावी करीत दमबाजी केली. शेतकऱ्याने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढला होता. त्याची तक्रार बाजार समिजीकडे केली होती. त्याची दखल घेत बाजार समितीने व्यापाऱ्याचा परवाना निलंबित केला आहे.