मालेगाव – अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरीत संकटातून बाहेर काढावे, अशी आग्रही मागणी मालेगाव भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसिलदारांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी, वीज बील माफी करावी, दोन लाखांपर्यंतचे कर्ज बिना व्याज उपलब्ध करुन द्यावे, अशी आग्रही मागणी मालेगाव भाजपने निवेदनात केली आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष निलेश कचवे, जितेंद्र गिल, नितीन सूमराव, समाधान कचवे, ज्ञानेश्वर वाघ आदी उपस्थित होते.