नाशिक – केंद्र सरकारच्या आधारभूत धान्य खरेदी योजना २०२०-२१ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मका खरेदी केली गेली. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवलाची नितांत आवश्यकता आहे. परंतु अद्यापही त्यांच्याकडून खरेदी केलेल्या मक्याची रक्कम खात्यावर वर्ग झाली नसल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर मका खरेदीची देय असलेली रक्कम लवकरात लवकर वर्ग करून त्यांना दिलासा द्यावा असे खासदार डॉ.भारती पवार यांनी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभाग मंत्रालय यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.