नवी दिल्ली – कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या ६० दिवसापासून सुरु असलेले शेतक-यांच्या आंदोलनाने आज आक्रमकरुप धारण केले. त्यांनी लाल किल्याचाही ताबा घेतला आहे. या परिसरातून शेतक-यांना हुसकवण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरु असतांनाच शेतक-यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेटस तोडत दिल्लीत प्रवेश केला. या आंदोलनामुळे पोलिसांनी आंदोलकांवर अश्रू धूरचा वापर केला. तर काही ठिकाणी लाठीचार्जही केला. नियोजित शेतक-यांची ट्रॅक्टर परेड प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर निघणार होती. पण, त्याअगोदरच शेतक-यांनी दिल्लीत प्रवेश केला. दिल्याच्या अनेक बॅार्डरवरुन शेतकरी मोठ्या संख्येने दाखल होत असल्यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. यातून या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या.
- इंडिया गेटकडे जाणारे सर्व मार्ग बंद
- पोलिस – आंदोलक आमने सामने
- आंदोलनाला हिंसक वळण
- योगेंद्र यादव यांचे शांततेचे आवाहन
- दिल्लीतील अनेक भागातील इंटरनेटसेवा बंद, रात्री १२ वाजता सुरु होणार