नवी दिल्ली – राजधानी दिल्ली परिसरात गेल्या ४७ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. या आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र फटकारले आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनप्रश्नी ज्येष्ठ विधीज्ञ दुष्यंत दवे आणि प्रशांत भूषण यांनी न्यायालयात बाजू मांडली. या आंदोलनाची दखल न्यायालयाने घेतली म्हणूनच कृषी कायद्यांना स्थगिती द्या अन्यथा आम्हीच त्यावर पाऊल उचलू, असे न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे. आम्ही कुणालाही निदर्शने करण्यापासून रोखू शकत नाही, असेही न्यायालयाने केंद्राला सांगितलं आहे. केंद्र सरकार ज्या पद्धतीने आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या मागण्या हाताळत आहेत त्याबाबत आम्ही नाखुश असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या सुनावणीत सांगितले की चर्चा सुरू आहे. पण प्रत्यक्षात तसे नसल्याचेही स्पष्ट होत आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
दरम्यान, न्यायालयातील सुनावणीनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला आहे. सरकार न्याय देत नसले तरी न्यायालय आम्हाला नक्की न्याय देईल, याचा आम्हाला विश्वास असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी आंदोलकांनी भारत माता की जय च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
https://twitter.com/ANI/status/1348537961567068172