नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या २ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल अखेर शिवसेनेने घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना नेत्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली सेना खासदार व सेना पदाधिकारी शेतकरी आंदोलकांची भेट घेणार आहेत. दुपारी १ वाजता ते आंदोलकांना भेटणार आहेत. यावेळी ते शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. तसेच, तिन्ही कृषी कायद्यांमुळे निर्माण झालेल्या तिढ्याबाबत सेनेची भूमिका कळविणार आहेत.
https://twitter.com/rautsanjay61/status/1356438595507154946
https://twitter.com/rautsanjay61/status/1356436633168449537