नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या दोन महिन्यांपासूनच्या शेतकरी आंदोलनाला आता ग्लोबल सेलिब्रेटींचे पाठबळ लाभत आहे. पॉप स्टार रिहाना, पर्यावरण चळवळीला बळ देणारी ग्रेटा थुनबर्ग यांनी ट्वीट करीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. या दोघींनीही सीएनएनची बातमी आणि त्यावर स्वतःचे मत प्रदर्शित केले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह जगभरात ही बाब चर्चेची ठरली आहे.
दरम्यान, भारतरत्न सचिन तेंडूलकरनेही एक ट्विट केले असून त्यात त्याने भारताविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांचा समचार घेतला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाबाबत कदापिही तडजोड केली जाऊ शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.
https://twitter.com/rihanna/status/1356625889602199552
https://twitter.com/sachin_rt/status/1356959311075934215
https://twitter.com/GretaThunberg/status/1356694884615340037