नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये थेट फूट पडली आहे. प्रजासत्ताक दिनातील ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर या आंदोलनात मोठ्या प्रमाणात घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळेच आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही संघटनांनी घेतला असतानाच दोन संघटनांनी त्यांचा अंतिम निर्णय जाहिर केला आहे. भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटन यांनी शेतकरी आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर या दोन्ही संघटनांनी टीका केली आहे. आम्ही आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे शेतकरी नेते व्ही एम सिंग यांनी जाहिर केले आहे.
यासंदर्भातील माहिती भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष भानू प्रताप सिंह यांनी दिली आहे. ट्रॅक्टर रॅलीतील झालेला हिंसाचाराने आम्ही खुपच व्यथित झालो आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलन थांबवित असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1354414036935352328