नवी दिल्ली – कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला नेता गीता भाटी यांचे सँडल चोरीला गेले आहेत. विशेष म्हणजे, सरकारने आपले सँडल जाणीवपूर्वक चोरी केल्याचा आरोप भाटी यांनी केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर तर सॅंडल शोधण्याबाबतचा हॅश टॅगच ट्रेंड झाला आहे. अनेक मजेदार ट्विट्स, मिम्स आणि पोस्टचा अक्षरशक्ष पाऊस पडत आहे. एका आंदोलकाने तर या सँडल शोधण्यासाठी चक्क एनआयए चौकशीची मागणी केली आहे.
किसान एकता संघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष गीता भाटी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, आपण एफआयआर दाखल करणार असल्याचेही सांगितले आहे. मी आंदोलन करू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि सरकारने सँडल चोरी केले आहेत. आता माझ्या सॅंडल कोण परत देणार? या सरकारने ते काम करावे, असे सांगणारा भाटी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर अनेक मजेशीर कमेंट पडत आहेत.