नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी एक घोषणा करुन संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल घेत एक दिवसांचा उपवास करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. सोमवारी (१४ डिसेंबर) दिवसभर मी उपवास करणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टी पूर्णपणे पाठिंबा देत आहे. शेतकरी सोमवारी उपवास करणार असल्याने तेही उपवास करणार आहेत.
दरम्यान, केजरीवाल यांना मधुमेहाचा त्रास असतानाही त्यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे याविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकीय पक्ष आणि नेते मोठ्या प्रमाणात राजकारण करत असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे.