इंडिया दर्पण EXCLUSIVE
जळगाव – नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली असून, देशभरातील ४०० संघटना यात सामील होणार आहेत. या आंदोलनामुळे पुन्हा एकदा कृषी प्रश्नांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. १९८० साली सुद्धा महाराष्ट्रात शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी जळगाव ते अमरावती अशी कृषी दिंडी निघाली होती. या आंदोलनांनी सुद्धा देशाचे लक्ष वेधले होते. अमरावतीमध्ये ही दिंडी गेल्यानंतर दोन लाखांहून अधिक शेतकरी उपस्थितीत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण, शरद पवारांसह देशभरातील १०० हून अधिक मोठ्या नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनाच्या आठवणींचा उल्लेख शरद पवार यांनी आपल्या `लोक माझे सांगाती` या राजकीय आत्मचित्रातही केला आहे. प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर यांनी याच आंदोलनात सादर केलेली रानमाळी एक झाल्या माणसांनी …हे उभे आकाश आता पेटलले ही कविता प्रचंड गाजली. हीच कविता देशभरातील आंदोलनांनाही प्रेरणादायी अशीच आहे. त्यामुळे महानोरांची ही कविता आता ४० वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामुळेच ती आता व्हायरल होत आहे…..