सोनीपत (हरियाणा) – नवी दिल्लीच्या सीमेवर गेल्या चार महिन्यांपासून सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. थंडी, ऊन, वारा आणि अवेळी आलेला पाऊस याची पर्वा न करता आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. मात्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही शेतकरी आंदोलकांनी दीड लाखांची झोपडी बनविली आहे, तिची खासियत काय आहे. ते जाणून घेऊ या…
आंदोलनच्या सुरूवातीस हिवाळ्यात शेतकऱ्यांनी बांबू, काठ्या आणि गवताचा पेंढा असलेल्या झोपड्या बनवल्या होत्या. परंतु या झोपड्या आता वाढत्या उष्णतेपासून वाचवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत पंजाबमधील रोपरमधील काही लोकांनी झोपडीच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर चिकणमाती लावली आहे.
झोपडीला एक आकर्षक करण्यासाठी रंगाने रंगविले गेले आहे. बुऱ्हानपूर गावातून कुंडली सीमेवर पोहोचलेले हरदीप सिंग आणि संजय म्हणाले की, चार महिन्यांपूर्वी धरणे सुरू झाले तेव्हा त्यावेळी थंडीला सुरुवात झाली होती. यानंतर भीषण थंडीनेही आंदोलनकर्त्यांचे मनोबल तोडले नाही.
आता उन्हाळा सुरू झाला असून उष्णतेपासून बचावाची व्यवस्था केली जात आहे. बांबू व काड्यासह झोपड्या बनवल्या झोपडीच्या आतील भिंती मातीने आणि चिखलाने बनलेल्या आहे. प्रत्येक झोपडीत आठ खाटा ठेवल्या आहेत.
एका आधुनिक झोपडीत तर वॉशबेसिन, फ्रिज, एलईडी टीव्ही स्क्रीन आणि इतर सोयी देखील आहेत. तसेच अग्निशामक यंत्र देखील बसविण्यात आले आहेत. आंदोलन दीर्घकाळ चालणार म्हणूनच एका मुख्य रस्त्यावरच हे एक छोटेसे झोपडी वजा घर असून ते बांधण्यासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च झाले आहेत.