नवी दिल्ली – कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी आता ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारबरोबर सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. त्यात सुधारणा किंवा अन्य नको आहे, असे आंदोलकांच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. दरम्यान, उद्या ५ डिसेंबर रोजी केंद्र सरकारबरोबर नियोजित असलेली चर्चा होणार की नाही याबाबतही साशंकता उपस्थित केली जात आहे.