नवी दिल्ली – शेजाऱ्यांच्या गोंगाटानं लोक नेहमीच त्रस्त असतात. त्याबद्दल ते बोलायला जातात, परंतु शेवटच्या क्षणी माघारी फिरतात. अनेक ठिकाणी भांडणंदेखील झालेले आहेत. अशाच एका प्रकरणात टिक-टॉकवरील एका महिलेने आपल्या शेजाऱ्यांना मजेशीर उत्तर दिलं आहे.
एका टिक-टॉक युजरनं हा किस्सा पोस्टद्वारे सांगितला आहे. ती आपल्या शेजाऱ्यांच्या सेक्स करण्याच्या आवाजानं हैराण झाली होती. सलग चार रात्र तिला या गोष्टीचा त्रास झाला. महिलेनं यासंदर्भात विनम्रतेनं एक संदेश पाठवला.
महिलेनं शेजाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं, की “तुम्ही तुमचा बेड भिंतीपासून थोडा दूर ठेवला तर ती गोष्ट अभिनंदनास पात्र असेल. ही रोजचीच गोष्ट आहे. मी आपल्या सेक्सच्या आवाजामुळे झोपू शकत नाही. आपली शेजारीण.” महिलेनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “रात्रीच्या आवाजानं मी हैराण झाले आहे. त्यांचा पलंग भिंतीला लागून असल्यानं पलंगाचा आवाज माझ्या खोलीपर्यंत येतो.”
हे पत्र शेजाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिलेनं एक मार्ग काढला. पत्र त्यांच्या दरवाजा खालून आत सरकवलं. शेजारचं जोडपं तिला काही तरी सुनावेल, असं तिला वाटत होतं. परंतु झालं उलटंच. ते प्रत्युत्तर देण्यात एक पाऊल पुढे होते. तक्रारकर्ती महिला आपल्या कुत्र्याला फिरवून घरी परतत असताना तिला बेडरूमच्या टाइल्सवर एक कार्ड पडलेलं दिसलं.
त्यामध्ये शेजाऱ्यानं लिहिलं, “मी आपल्याला होत असलेल्या असुविधेबद्दल माफी मागतो. या आवाजाबाबत मी अधिक चांगलं काम करेन.” एवढंच नव्हे, शेजाऱ्यानं सॉरी म्हणण्यासाठी कार्डमध्ये ५० डॉलरचं एक स्टारबक्स गिफ्ट व्हाऊचरही दिलं. टिक-टॉकवर या क्लिपला २,२०,००० हून अधिक लोकांनी पाहिलं आहे. अनेक लोक यावर वेगवेगळ्या कॉमेंट करत आहेत. एकानं तर लिहीलं, “वाह सुपर चिल पडोसी”!