मुंबई – शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी (२० ऑगस्ट) दिवस अखेर ३९४ अंकाची मोठी घसरण नोंदवत, ३८ हजार २२० वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आज दिवस अखेर ९६ अंकाची घसरण नोंदवत ११ हजार ३१२ वर स्थिरावला.
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह च्या उदासीन दृष्टिकोनामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये साशंकता निर्माण होऊन, जागतिक भांडवल बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्याचा परिणाम होऊन देशातले स्थानिक शेअर बाजार घसरले असे मत, तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सोन्या- चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. दिल्लीत सोन्याच्या दरात आज दहा ग्रॅम मागे १ हजार ४९२ रुपयांची घसरण झाली, आणि तो. ५२ हजार ८१९ रूपयांवर आला. मुंबईत सोन्याच्या दरात आज ९९० रुपयांची घसरण आली, काल ५२ हजार ८९० रुपये प्रति दहा ग्रॅम असलेला सोन्याचा दर आज ५१ हजार ९०० रुपयावर आला.

चांदीच्या दरातही आज मोठी घसरण दिसून आली. दिल्लीच्या सराफा बाजारातील चांदीचा भाव आज ६७ हजार ९२४ रुपये प्रती किलो इतका असून काल तो ६९ हजार ४०० रूपये प्रती किलो होता, तर मुंबईमधे कालच्या ६८ हजार १०० रुपये असलेला चांदीचा दर आज अकराशे रुपयांनी कमी होऊन ६७ हजार रुपयांवर स्थिरावला.