दिंडोरी – कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ बुधवारी (३० सप्टेंबर) होणार आहे. चेअरमन श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली रोजी सकाळी १० वाजता हा समारंभ होईल, अशी माहिती कादवाचे उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव यांनी दिली आहे.
कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुरेशी ऊस तोड मजूर भरती केली आहे. बॉयलर अग्नी प्रदीपन पूजन विठ्ठल त्र्यंबक संधान (चिंचखेड), बाळासाहेब मुरलीधर आथरे (पिंपळगाव केतकी) आणि अशोक माधव भालेराव (तिसगाव) यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. सदर कार्यक्रमास सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करत उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक मंडळ व प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.