कळवण – कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याप्रकरणी कळवण तालुका शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. कर्नाटक सरक्रने सन्मानपूर्वक आणि तातडीने महाराजांचा पुतळा बसवावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी तहसिलदार बी ए कारने यांना सेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून सरकारने महाराजांचा अवमान केला आहे. कर्नाटक भाजपा सरकारचा व येथील प्रशासनाचा कळवण तालुका व शहर शिवसेनेच्या व शिवभक्तांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. कर्नाटक सरकारने शिवभक्तांच्या अंत न पाहता सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तात्काळ बसवावा अन्यथा शिवसेनेच्यावतीने कर्नाटक विरोधात आक्रमक आंदोलन छेडू, असा गर्भित इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, शहरप्रमुख साहेबराव पगार, माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, विधानसभा सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, उपतालुकाप्रमुख डॉ दिनेश बागुल, विनोद भालेराव, विभागप्रमुख शितलकुमार अहिरे, ग्राहक कक्ष ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय रौंदळ, शहरप्रमुख किशोर पवार, उपशहरप्रमुख विनोद मालपुरे, अजय पगार, आप्पा बुटे आदी उपस्थित होते.