मुंबई – शिवसैनिक म्हणून आले, शिवसैनिक म्हणून काम करेल असे सांगत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, शिवसेना महिला आघाडी भक्कम आहे, मी तिचा भाग असल्याचा आनंदही असल्याचे त्यांनी सांगितले. मी पिपल्स मेड स्टार आहे. लोकांनी बनवलेली लीडर होणं पसंत करेन असेही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी वर्षेभरात महाविकास आघाडी सरकारने कठीण काळात चांगले काम केले. शिवसेना प्रवेशासाठी कोणताही दबाब नव्हता असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी कंगना रणावत यांच्या विषय़ावर बोलतांना सांगितले. नको तितके या विषयाला महत्त्व दिले असे सांगत या प्रश्नावर अधिक बोलणे टाळले. यावेळी त्यांनी ट्रोल करणा-याचे स्वागत करते असे सांगून त्यावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचा अचानक राजीनामा दिला नाही. १४ महिन्यापूर्वी सोडल्याचे त्यांनी सांगितले.