नाशिक – नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय जीवनगौरव व गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांची घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगरसेवक संग्राम करंजकर व निवड समितीचे अध्यक्ष के.के.आहिरे यांनी केली आहे. या पुरस्कारामधील जीवनगौरव पुरस्कार व्ही.एन नाईक शिक्षण संस्था नाशिकचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांना तर आदर्श संस्था पुरस्कार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यांना जाहीर झाला आहे.
उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून गोंदे दुमाला येथील तुषार पाटील,चांदवडच्या संगीता बाफना (माध्यमिक) नाशिकरोडच्या मंगल गोविंद (प्राथमिक) यांना दिला जाणार आहे. विविध विभागातील गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुक्रमे जि.प.शाळा,मोह ता.सिन्नर संदीप गीते, जि.प.शाळा संघर्षनगर रंजन कदम, जि.प.शाळा पाडे ता. दिंडोरीचे विलास पोतदार. उपक्रमशील शिक्षिका विजया दुधारे ( प्राथमिक),साधना नंदकिशोर राणे (डे केअर प्राथमिक,नासिक) संदीप देशपांडे, छत्रे विद्यालय मनमाड (साहित्य), नाशिकचे एस.के शिंदे ( सामाजिक), अरुण माऊली पाटील,मालेगाव (राजकीय), रावसाहेब तांबे,सिन्नर ( सहकार ), सचिन पगार,लाखलगाव (संघटन ), पांडुरंग अहिरे,बागलाण (पत्रकारिता),डॉ. प्रतिभा जाधव (महिला सबलीकरण), जोत्स्ना पाटील,मोहाडी (चित्रकला), विजय ढोके सायने मालेगाव (विज्ञान ), कीर्ती कुमार गहाणकरी,नासिक विलास निरभवने खेडलेझुंगे (क्रीडा ), बद्रीनाथ रायते पिंपळगाव ब (स्काउट), माधुरी कुलथे नासिक (गाईड ), बी.एन.देवरे,कळवण, मनखेडचे नासिर मणियारमनखेड ( आदिवासी ), नगरसूलचे राजाराम बिन्नर (अध्यात्म ), नाशिकचे विशाल जोशी ( एनसीसी ) वैशाली दाणी नाशिकरोड , संदीप औटे लासलगाव (शिक्षकेत्तर), राजेंद्र जाधव नासिक (प्रयोगशाळा सहाय्यक ),विलास पाटील द्वारका नासिक (इंग्रजी), बाळासाहेब सोनवणे गंगापूर नासिक ( दिव्यांग ), कल्पना जाधव मनमाड (अंगणवाडी सेविका ), भेंडाळी ,अरविंद पाटील, किशोर शिंदे देवळाली, सरिता जोशी रमाबाई आंबेडकर यांना (विशेष पुरस्कार) जाहीर करण्यात आले आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण मार्चमध्ये एका शानदार सोहळ्यात केले जाणार आहे. सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन निवड समितीचे सदस्य साहेबराव कुटे, रवींद्र मालुंजकर, संजय पाटील, किरण पगार, डी.यु.अहिरे आदींनी केले आहे.