राळेगणसिद्धी – ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांचे ३० जानेवरी रोजी प्रस्तावित असलेले उपोषण मागे घेतले आहे. यासंदर्भात भाजपनेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली. पण, त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये अण्णांच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत अग्रलेख लिहण्यात आला. त्यावर अण्णांनी सुध्दा प्रत्युत्तर दिले असून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
या अग्रलेखात मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवरही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आजचा अग्रलेख लिहण्याचे कारण काय ते सांगा मी सगळेच बाहेर काढतो अस म्हणत अण्णांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेवर टीका करतांना अण्णांनी थेट इशाराही दिला. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईल असेही ते म्हणाले.
काय आहे सामनाच्या अग्रलेखात
अण्णांनी उपोषण जारी करुन पुन्हा माघार घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. लोकशाही, शेतकरी आंदोलन, शेतक-यांचा सन्मान याबाबत अण्णांची नेमकी भूमिका काय, सध्याच्या घडामोडींवर त्यांचे मत काय, मुळात कृषी कायदे रद्द करण्यात यावेत ही अण्णांची मागणी असली तरी यावर भूमिका मात्र स्पष्ट नाही. शेतक-.यांना नैतिक बळ देण्याच्या उद्देशाने अण्णांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. यासह अनेक मुद्दे सामनाच्या अग्रलेखात आहे.