नाशिक – शिवसेनेचे खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन झाले. देवळाली गाव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६८ साली शाखेचे उदघाटन केले होते. त्या शाखेचे नुतणीकरण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी त्यांनी एका लग्नसोहळ्यात हजेरी लावली.
राऊत नाशिककला आल्यामुळे राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. त्यांच्या उपस्थितीतीत शिवसेनेचे दोन माजी नेते भाजप सोडून शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा दिवसभर रंगत होती. पण, विकास कामाचे उदघाटन सोडल्यास इतर राजकीय कोणतेही कार्यक्रम नव्हते. त्यांनी दिवसभर कोणतेही राजकीय भाष्य गुरुवारी केले नाही. शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलणार असल्याचे बोलले जात आहे.