दोन दिवस घरोघरी प्रसादाचे वाटप
नाशिक – शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनच्या वतीने काल शुक्रवारी तिडकेनगर येथे श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा मंगलमय वातावरणात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पूजा व आरती करण्यात आली. परिसरातील हजारो भाविकांना काल व आज असे दोन दिवस घरोघरी बंद पाकिटातील बुंदीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मास्कही देण्यात आले.
दरवर्षी औदुंबर वाटिका उद्यानात मोठ्या स्वरूपात श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा साजरा केला जातो. शुक्रवारी सकाळी ११ वाजता वैभव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली २१ महिलांनी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण केले. दुपारी १२ वाजता मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत आरती व पूजा करण्यात आली. त्यानंतर लगेचच दुपारी २ वाजेपासून तिडकेनगर, जगतापनगर, उंटवाडी, सिडकोतील पाटीलनगर, हेडगेवारनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, प्रियंका पार्क येथे घरोघरी बुंदीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. दुसर्या दिवशी आज शनिवारी सकाळी ९ वाजेपासून याच परिसरातील उर्वरित भागात दिवसभर प्रसादाचे वाटप सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरपोच प्रसाद मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, ‘सामना’चे पत्रकार बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, श्रीकांत नाईक, डॉ. शशीकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. हंसराज वडघुले, मनोज पाटील, मंदार सडेकर, अशोक पाटील, राहुल काळे, सचिन जाधव, अविनाश कोठावदे, मगन तलवार, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, अॅड. अमोल जाधव, गणेश पाटील, विजय कांडेकर, मनोज दुसाने, मयूर ढोमणे, बापू महाले, कुणाल महाजन, बापूसाहेब आहेर, व्ही. एस. पाटील, जितेंद्र जैन, राहुल कदम, शैलेश महाजन, मकरंद पुरेकर, मनोज वाणी, दिग्विजय पवार, डॉ. आर. पी. चोपडे, डॉ. पी. डी. महाजन, सचिन राणे, परेश येवले, राकेश येवले, राम भंडारी, विजय शिरोडे, धवल खैरनार, सुजाता काळे, मीना टकले, मनीषा मिंधे, संध्या बोराडे, मीरा खैरनार, उज्ज्वला सोनजे, मिनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, संकेत गायकवाड, प्रथमेश पाटील, सार्थक कोळपकर, रोहन जगताप, प्रणव जगताप यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.